Ad will apear here
Next
उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं
उद्योग असो वा नोकरी काम करताना चुका होताच राहतात; पण अशा चुकांमधूनच धडा घेऊन यशाच्या शिखराकडे जाता येते. विश्वास वाडे यांनी या पुस्तकात एखाद दुसऱ्या नव्हे, तर तब्बल १४० चुका सांगितल्या आहेत. व्यवसाय तर करायचाय, पण नियोजनच नसेल, तर कष्टावर पाणी फिरायला वेळ लागत नाही, किंवा स्वतःच्या क्षमता-कमतरतांची माहिती नसेल, नव्या कल्पनांची वानवा असेल, तर अपयश हे ठरलेलेच.

योग्य वेळी निर्णय घेतला नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पुस्तकाच्या पहिल्या भागात या आणि अशा चुकांची माहिती दिली आहे. दुसरा भाग संधी, वेळ, मानसिक आरोग्य आदींचा आढावा घेतो, तर तिसऱ्या भागात बिझनेस नेट्वर्किंग, व्यवसाय बदल, विचारांची कक्षा रुंदावण्याची गरज सांगितली आहे.

प्रकाशक : संधिकाल प्रकाशन
पाने : ४०४
किंमत : ६५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZPEBQ
Similar Posts
उद्योग संस्कार सध्या सर्वत्र उद्योजकतेचे वातावरण आहे. नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाकडे वळण्याचा सल्लाही अनेकदा दिला जातो. पण हे कसे शक्य होणार, असा प्रश्न पडू शकतो. म्हणूनच मुलांवर लहान वयातच उद्योगाचे संस्कार केल्यास त्यातून कमी वयात उद्योजक निर्माण होऊ शकतो, हा विचार देत विश्वास वाडे यांनी ‘उद्योग संस्कार’मधून छोटे छोटे मुद्दे स्पष्ट करत केला आहे
सासू सुनेची संपूर्ण चातुर्मास मेन्यू डायरी आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळास चातुर्मास म्हटले जाते. या चार महिन्यांस धार्मिक महत्त्व आहे. या काळात अनेक सणवार येतात. उपवासही असतात. अनेक जण कांदा, लसूण खाण्यातून वर्ज्य करतात. अशा वेळी कोणते पदार्थ करता येतील याची माहिती व पाककृती शीला बारपांडे व प्रणाली बारपांडे यानी ‘सासू सुनेची
युनायटेड वेस्टर्न बँक कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language